Thursday, November 18, 2010

शिवशाहीतील अज्ञाताचा शोध - जिंतीकर भोसले




शिवाजी महाराजांचे थोरले बंढू म्हणजेच शहाजीराजे व मातोश्री जिजाबाई यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे यांच्या विषयीचे अनेक गैरसमज इतिहासकारांनी लिहिलिल्या बखरीत सापडतात. संभाजीराजांची शाखा, त्यांचे घराणे यामुळेच अज्ञात 
राहिले आहे. शिवशाहीतील अज्ञात शोध.

छत्रपती शिवाजीमहाराज हे तमाम मराठी मनाचे श्रद्धास्थान आहे. छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर या शाखेबरोबरंच तंजावरच्या भोसले घराण्याचीदेखील महाराष्ट्राला ओळख आहे. परंतु महाराष्ट्रातच असणारी छत्रपतींचे थोरले बंधू संभाजीराजे यांची शाखा महाराष्ट्राला पूर्णपणे अज्ञात आहे, याचे कारन म्हणजे हे संभाजीराजे अल्पवयातंच मारले गेले असा एक समज इतिहासाकारांनी करून घेतला, त्यामुळे हे घराणे व त्यांचे कर्तुत्व कायम अज्ञातंच राहिले. मोठ-मोठया इतिहासाकारांनीदेखीला या घराण्याचा परामर्ष घेतला नाही, बखरकारांनी अज्ञानातून जे चित्र रेखाटले त्यामुळे या घराण्याचा फारसा विचार झाला नसून, काही माहिती पुढे आली, तीदेखील चुकीची ठरली.

शहाजीराजे आणि मातोश्री जिजाबाई याचे संभाजीराजे हे ज्येष्ठ पुत्र, ‘राधामाधवविलासचंपू’ कर्त्या जयरामने या संभाजीराजांचा उल्लेख ‘ युवराज संभाजीराजे’ असा केलेला आहे. मराठयांच्या इतिहासात प्रमाण मानल्या गेलेल्या सभासदाने आपल्या बखरीत या संभाजीराजांच्या जन्माचा उल्लेखदेखील केलेला नाही; फक्त अफजलखान प्रकरणात शिवाजी महाराजांच्या तोंडी या संभाजीराजांच्या मृत्युचा उल्लेख सभासद करतो.

चित्रगुप्त, एक्क्याण्णवकलमी बखर, मराठी साम्राज्याची छोटी बकर, शेदगावकर भोसले बखर, श्री शिवदिग्विजय, शिवाजीप्रताप यामध्ये या संभाजीराजांचाअ उल्लेख आलेला आहे. याबरोबर बृहदीश्वर शिलालेखात काही माहिती विस्ताराने सापडते. परमानंदाने आपल्या शिवभारतात शहाजीला जिजाऊपासून सहा शुभलक्षणी पुत्रझाले. त्यापैकी शंभू व शिवाजी हे दोघेच वंशवर्धक झाले असा उल्लेख केलेला आहे. फारसी साधनात बादशहानाम्यात संभाजीराजांचा उल्लेख दोन हजारी मनसबदार असा दिसतो. संभाजीराजांचा बहुतेक काळ कर्नाटकात गेल्याने महाराष्ट्राशी त्यांचा संबंध आला नाही. त्यामुळे नंतरच्या काळारदेखील मराठयांच्या इतिहासात त्यांचे उल्लेख आढळत नाहीत व अज्ञाताचे हे गूढ वाढतंच जाते.
एक्क्याण्णवकलमी बखरीत संभाजीचा पुत्र उमाजी याचा उल्लेख एकदा आलेला आहे. याशिवाय अन्य बखरकारांनी संभाजीराजांच्या पुत्रांचा उल्लेख केलेला नाही. परमानंदानेदेखील शिवभारतात संभाजी व जयंतीबाई यांच्या विवाहाविषयी विस्ताराने लेखन केले असले तरी त्यांच्या मुलाविषयी मौन पाळलेले आहे. शेडगावकर भोसले बखरीत तर ‘त्यांच्या पोटी संतान नाही’ असा उल्लेख सापडतो.

बृहदीश्वर शिलालेखात संभाजीराजांचा पुत्र उमाजीचा स्पष्ट उल्लेख केला गेलेला आहे. त्याचबरोबर उमाजीचा मुलगा परसोजी याचा जन्म झाल्याची नोंद या शिलालेखात सापडते. याशिवाय अफजलखान-वधाच्या पोवाडयात उमाजीचा उल्लेख आलेला आहे. उमाजीचा या पोवाडयामधील उल्लेख थेट संभाजीचा पुत्र असा जरी नसला तरी ‘पुतण्या उमाजी राजाला’ (म्हणजे शिवाजी राजांना) असा आलेला आहे. बृहदीश्वर शिलालेखानुसार संभाजीला जयंतीबाईखेरीज गौरीबाई आणि पार्वतीबाई अशा आणखी दोन स्त्रिया असल्याची माहिती मिळते, उमाजी हा संभाजीराजांचा दत्तक पुत्र नव्हता हे जेधेशकावलीमधल्या नोंदीवरून सिद्ध होते. जेधेशकावलीमध्ये उमाजीचा जन्म २५ नोव्हेंबर १६५४ ला झाला अशी नोंद मिळते. शहाजीराजे इ.स. १६६४ मध्ये वारले तेंव्हा हा उमाजी दहा वर्षांचा होता.
उमाजीस विजापूरकरांतर्फे जहागीर होती. ऐन तिशीच्या सुमारास हा आपल्या समशेरीच्या बळावर पराक्रम गाजवत असल्याचा पुरावा इ.स.१६८३ च्या एका महजरावरून मिळतो. उअमाजीला बहादूरजी नावाचा एक पुत्र होता. त्याचादेखील एक हुकूम उपलब्ध आहे.

‘मालोजी भोसले यांचे फर्जंद शहाजी संभजी यांचे फर्जंदौमाजी याचे बहादूरजी.....’ सरचा हुकूम १२ डिसेंबर १६८९ चा आहे.

उमाजीशिवाय संभाजीराजांना सुरतसिंग आणि मातोजी असे आणखी दोन पुत्र असल्याचे पुरावे मानडी साधनात मिळतात. मराठी साधनात मात्र यांचे उल्लेख नाहीत. उमाजी या एकाच संभाजीपुत्राचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंध आला, त्याची शाखा महाराष्ट्रार विस्तारली म्हणून त्याची काही माहिती मराठयांच्या इतिहासात मिळते.

संभाजीराजांची पत्नी जयंतीबाई हिचेच दुसरे नाव मकाऊ होते असा गैरसमज काही इतिहासकारांच्या लेखनामुळे रुढ झालेला आहे. ऐतिहासिक वंशावळीमध्येदेखील मकाऊ ही संभाजीराजांची पत्नी असल्याचा उल्लेख येतो. ही वंशावळ इनाम कनिशनपुढे ग्राह्य ठरलेली आहे. वास्तवात गोष्ट अशी की, जयंतीबाई ही विवाहानंतर संभाजीराजांच्या बरोबर कर्नाटकात कोलारप्रांती गेली ती अखेरपर्यंत तिकडेच होती. संभाजीराजांच्या मृत्युनंतरदेखील कोलार तालुक्यात जयंतीबाईंनी केलेल्या दान व बक्षिसाचे पुरावे ही बाब सिद्ध करतात. जयंतीबाईंनी दान केल्याचा अखेरचा शिलालेक्ह हा इ.स.१६९३ चा आहे. म्हणजेच जयंतीबाई या १६९३ पर्यंत हयात होत्या व त्या कर्नाटकात वास्तव्य करून होत्या हे ठामपणाने सांगता येते. दुसरी गोष्ट म्हणजे मकाऊ भोसले या इ.स १७४० पर्यंत जिंतीचा कारभार करताना दिसतात. त्यांची समाधीदेखील जिंती या गावी आहे. यावरून जयंतीबाई व मकाऊ या दोघी एक नव्हेत हे सिद्ध होते. सासू आणि सून यांची बखरकारांनी गल्लत केलेली आहे. मकाऊ ही उमाजी भोसले याचीं पत्नी होती. यांस बहादूरजी नावाचा पुत्र होता, परंतु त्याच्यानंतर मकाऊने भांबोरेकर भोसले घराण्यातील परसोजी हा दत्तक घेतला. हा परसोजी म्हणजे शहाजीराजांचा चुलतभाऊ परसोजी यांचा पणतू, यांच्यापासून जिंतीकर बोसले घराण्याचा वंश पुढे वाढला. 
  
छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्या महाराष्ट्रात वाढलेल्या वंशाचा इतिहास असा आहे. भोसले घराण्याची जी पाटीलकीची गावे वंशपरंपरागत आलेली होती त्यापैकी जिंती हे एक होते. बादशाही कागदपत्रात मकाऊचा उल्लेख मकुबाई पाटलीण जिंतीकर असा येतो. नात्याने मकुबाई शाहू महाराजांची चुलत चुलती लागत होती. त्यांचा स्नेह शाहू दप्तरातील कागदपत्रांतून वारंवार दृष्टीस पडतो. शाहूने वेळोवेळी आपल्या या चुलतीचा परामर्ष घेतल्याचे दिसते. मकाऊस काही अडचण आल्यास ती निवरण करण्याचे आदेश शाहूने आपल्या कमाविसदारास दिलेले दिसतात. शाहू छत्रपती मोगलांचे कैदेत असताना छत्रपती राजारामने मकाऊस धनाजी जाधवाकडून एक गाव दिल्याची नोंद ताराबाईकालीन कागदपत्रात सापडते.

इ.स.१७३० च्या सुमारास मोगलांचा करमाळा येथील बंडखोर सरदार राजा रावरंभा निंबाळकर याने जिंती गावास व मकाऊस काही उपद्रव केला. त्या वेळी बादशहाने निंबाळकरास मकाऊस उपद्रव न करण्याची तंबी दिल्याचे पत्र जिंती दप्तरात पहावयास मिळते. इ.स.१७४० पर्यंत शाहू दप्तरात मकाऊचे उल्लेख सापदतात. आपळ्या आदर्श कारभाराने मकाऊ देवत्वास पोहोचली. आज जिंती गावात तिचा उल्लेख मकाई असा केला हातो. ग्रामस्थ तिला देवी मानतात व दरवर्षी तिची जत्रा भरते.

सोलापूर, पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणार्‍या जिंती गावात आजही मकाऊचा चार बुरुजांनी युक्त असा वाडा आहे, त्यात संभाजीराजांच्या या शाखेचे विद्यमान वंशज राहतात. वाडयाच्या तटाची बरीच पडझड झालेली आहे, परंतु सतराव्या शतकातील वैशिष्टये दाखविणारे महाद्वार अजून चांगल्या अवस्थेत आहे. चिरेबंदी असणार्‍या या महाद्वारावर वरच्या बाजूल लाकडातंच सुबक अशी गणेशपट्टी  कोरलेली आहे. या मधील गजानन हा ऋद्धीसिद्धीसहित असून उजव्या सोंडेचा आहे.  बाजूला दोन्हीकडे सुबक अशी वेलबुट्टी  कोरलेली आहे. गणेशपट्टीच्या वर असणारा भाग हा पातळ विटांत बांधलेला असून विटांमध्ये नक्षीकाम केलेले आहे.
वाडयाच्या अंतर्भागात मोठी पडझड झालेली असून आतील सर्व बांधकाम काळाच्या ओघात नष्ट झालेले आहे. वाडयाच्या खालच्या भागात असणारे भुयार मात्र अगदी चांगल्या अवस्थेत आहे. याची उंची साधारणत: सात-साडेसात फूट एवढी आहे. याचे बांधकाम अगदी चिरेबंदी असे आहे. यात आत उतरण्यास दोन्ही बाजूंनी जिने आहेत. या भुयाराच्या भिंतीमध्ये कोनाडे काढलेले असून त्यामध्ये खजिन्यासाठी रांजण बसविलेले आहेत.

जिंती गावच्या शेजारी एका चौथार्‍यावर या गावची पाटलीण मकूबाई भोसली जिंतीकर उपाख्य मकाईची एक छोटेखानी अशी समाधी आहे. एवढीच आज या गावात मकाऊची स्मृती आहे. दरवर्षी येथेच यात्रा भरते. गावातले आणि आसपासची काही बांधकामे सतराव्या शतकाची वैशिष्टये बाळगून आहेत. मराठयांच्या इतिसात जिंती गाव आणि जिंतीकर भोसले घराणे यांची फारशी दखल घेतली गेलेली नाही, हे या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते.

शिवछत्रपतींचे थोरले बंधू संभाजीराजे हे आदिलशाही मनसबदार होते. कर्नाटकात शहाजीराजांचे व त्यांचे वास्तव्य हे एखाद्या स्वतंत्र राजासारखे होते, परंतु महाराष्ट्रात असणार्‍या त्यांच्या वंशजांनी मोगली मनसबदारातंच धन्यता मानली. छत्रपती शिवाजी महाराजांची ‘स्वराज्य, स्वराष्ट्र व स्वधर्म’ ही कल्पना महाराष्ट्रातील त्यांच्या आप्तांच्या देखील पचनी पडू शकली नाही. तंजावरकर भोसल्यांच्या प्रमाणेच जिंतीकर भोसलेदेखील याला अपवाद ठरू शकले नाहीत. त्यामुळेच इतिहासाच्या अडगळीतंच गेली. महाराष्ट्रात ही शाखा असूनदेखील ती आज अशी अज्ञातात आहे. (लेखन-छायाचित्रण- अनिरुद्ध बिडवे)

Tuesday, September 7, 2010

साम्राज्य स्वप्नाची सुवर्णपहाट !

मराठेशाहीच्या इतिहासामध्ये जर मराठा साम्राज्य या संज्ञेचा जनक आणि या स्वप्नाचा साकरता कोण असा सवाल उपस्थित झाला तर याचे निर्विवाद एकच उत्तर असेल -  श्रीमंत थोरले बाजीराव बल्लाळ पेशवे साहेब उर्फ ” राउ“.राउंचे पाळण्यातील नाव विसाजीपंत, ह्यांचा उल्लेख कागद पत्रातून राउ/राया/पंडत असा येतो. राउच्या कारकीर्दीची सुरुवात म्हणजे मराठा स्वराज्याची साम्राज्यात रुंपांतरित होणाऱ्या एका सुवर्णपहाटेची सुरुवात. 
शाहू महाराज १७०७ ला  औरंगझेबाच्या कैदेतून सुटून आले तेव्हा महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. शाहू महराज व ताराबाई यांच्यामध्ये स्वराज्याच्या राजगादीसाठी संघर्ष सुरु होता.
छत्रपती संभाजी राजांचे पुत्र म्हणून शाहू महाराजांना बऱ्याच मातब्बर सरदारांचा पाठिंबा होता. पण त्याच वेळी ७ वर्षे औरंगाझेबाबरोबर कडवी झुंज देणाऱ्या ताराराणी  साहेबांच्या पक्षातही मुत्सद्दी तसेच रणझुंजार मराठ्यांचा भरणा होता. त्याच काळात शाहू महाराजांच्या पक्षात एका मुत्साद्द्याचा उदय झाला ते म्हणजे कोकणातील श्रीवर्धनचे बाळाजी विश्वनाथ भट होत. त्यांनी सिद्द्यांच्या जाचाला कंटाळून श्रीवर्धन सोडले आणि ते देशावर आले. तेथे त्यांनी शंकराजी नारायण सचिव, रामचंद्रपंत अमात्य, सेनापती धनाजी जाधव यांचेकडे चाकरी केली. परंतू शाहू महाराजांच्या पक्षात आल्यानंतर आपल्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाच्या जोरावर त्यांनी पुढील वाटचाल सुरु केली. शाहू महाराजांनी त्यांना “सेनाकर्ते” ही पदवी देऊन भूषविले. त्यांची पुढे पेशवे पदावर नियुक्ती झाली. शाहू महाराजांवर खूप आणीबाणीचे प्रसंग येऊनही बाळाजी विश्वनाथांनी त्यांची बाजू कधीही सोडली नाही.
कान्होजी आंग्रे हे ताराबाई साहेबांच्या पक्षातील एक वजनदार नाव होते. मराठ्यांच्या आरमाराचे ते प्रमुख अर्थात सरखेल होते. कोकणातील असल्यामुळे बाळाजी विश्वनाथ आणि कान्होजी आंग्र्यांचा घरोबा होता. कान्होजी आंग्र्यांनी शाहू महाराजांच्या बहिरोपंत पेशव्यास तसेच निळो बल्लाळ या चिटणीसास राजमाची किल्ल्यात कैद करून ठेवले. लोहगड, राजमाची काबीज केले होते.त्यावेळी बाळाजी विश्वनाथ ३ ते ४ हजार फौज घेऊन लोहगडाजवळ आले. आंग्रे ओलावण येथे पेशव्यांना भेटले. तेथे बाळाजी विश्वनाथ यांनी कान्होजी अंग्रे यांना ८ फेब्रु १७१४ रोजी शाहू महाराजांकडून सरखेल पद देऊ केले आणि समेट घडवून आणला. पुढे दिल्लीला धडक देऊन स्वराज्याच्या सनदा, चौथाई चे हक्क तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे महाराणी येसूबाई साहेब यांची सुटका करणारा हा पेशवा १७२० च्या मार्च महिन्यात सासवड मुक्कामी अल्पशा आजाराने मरण पावला.
पुढे शाहू महाराजांच्या दरबारात पेशवे पदावरून वाद वाढू लागले. त्यावेळी दरबारात बरेच जुने जाणते पोक्त मुत्सद्दी होते, पण शाहू ने आपल्या स्वराज्याचा पेशवा म्हणून बाळाजी विश्वनाथ भट यांचा पुत्र विसाजी अर्थात बाजीराव यास पेशवे पद देण्याचे नक्की केले. बाजीरावांना पेशवे पद हे वंश परंपरेतून मिळाले नव्हते तर बाजीराव हा तरुण, युद्धनिपुण, रणझुंजार होता. तसेच बाळाजी विश्वनाथांच्या तालमीत तयार झालेला होता. म्हणून शाहू महाराजांना तोच पेशवे पदासाठी योग्य वाटला.
१८ व्या शतकाच्या सुरवातीच्या काळात राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाली. बाजीराव याच काळात लहानाचा मोठा झाला. वडिलांबरोबर दिल्ली स्वारीवर बाजीराव गेला तेव्हा तो अवघा १८/१९ वर्षांचा होता. त्यावेळी दिल्लीतील मुघलांच्या साम्राज्याची अवस्था तसेच तेथील विस्कळीत परिस्थिती बाजीरावांनी खूप जवळून पहिली. लेखन, वाचन, हिशेब, घोड्यावर बसणे, कसरत, भालाफेक, तलवारबाजी यात ते तरबेज झाले होते. त्यांना पेशवेपद देऊ नये असा सल्ला दरबारातील वरिष्ठांनी शाहू महाराजांना दिला होता परंतू बाळाजी विश्वनाथ यांनी जीवादाराभ्या श्रम साहस करून,पुढे सुख भोगिले नाहीयाज करिता त्यांस वस्त्रे तूर्त देतोयांचे दैवी असल्यास श्री शंभू कृपा करीलउपयोगी नाही असे दिसल्यास पुढे विचार होईल.” असे उत्तर देऊन बाळाजी च्या मृत्यू नंतर १५ दिवसांनी, चैत्र बहुल सप्तमी, गुरुवार, शके १६४२ दिनांक १७ एप्रिल १७२०, रोजी कराड नजीक मसूर मुक्कामी शाहू महाराजांनी थोरले बाजीराव यांस पेशवाईची वस्त्रे दिली.
वीराला रणांगणात धैर्य आवश्यक असते, तसेच सेनापतीला शत्रूचे बळ, युद्धनिपुणता, सैन्याचे मनोबल या सर्वाची निट माहिती असणे गरजेचे असते. याचबरोबर खऱ्या सेनानीला रणक्षेत्राची भौगोलिक रचना लढाई जिंकण्याच्या दृष्टीने माहित असणे आवश्यक असते. भौगोलिक परिस्थितीचा शत्रूला अडचणीत आणण्याकरिता योग्य उपयोग करून घेणे ही एक कलाच आहे. ज्याप्रमाणे स्वराज्यावर चालून आलेल्या गनिमांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमीकाव्याने वारंवार धूळ चारली. पुढे त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन छत्रपती संभाजी महाराज, संताजी घोरपडे, धनाजी जाधव आदी वीरांनी शत्रूला सळो का पळो करून सोडले. अगदी तशाच प्रकारे थोरल्या बाजीराव पेशव्यांनी युद्धनीती वापरून शत्रूला रणांगणावर चीत केले. आपल्याला अनुकूल अशा रण क्षेत्रात शत्रूला येण्यास भाग पडून तेथे त्याचा पराभव करणे हे बाजीरावांचे युद्धतंत्र होते. म्हणूनच २० वर्षांच्या कारकिर्दीत लहान मोठ्या अशा एकूण ३६ लढाया होऊनही त्यांना कधीच पराभव पत्करावा लागला नाही. किंबहुना निजाम, मुघल तसेच माळवा, बुंदेलखंड, राजस्थान, उत्तर भारत या प्रांतांमध्ये त्यांच्या नावाचा दबदबा राहिला.
बाजीरावांनी  निजामाला पराभूत केलेच पण दिल्लीवरही धडक देऊन मराठी सैन्याचा हिसकाही दाखवला. त्यांनी आपल्या भोवती शिंदे, होळकर, पवार इत्यादी तरुण तडफदार सरदारांचे वलय निर्माण केले, त्यातूनच पुढे या सरदारांचा उदय आणि उत्कर्ष झाला. इतका पराक्रम, सैन्यबळ असूनही कधीही सत्तेची लालसा या पेशव्यांनी बाळगली नाही. साताऱ्याच्या गादीवरील छत्रपती शाहू महाराजांच्या चरणाशी इमान राखून त्यांनी संपूर्ण भारतवर्षात पराक्रम गाजवला आणि विजयी झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला त्यांनी साम्राज्याचे स्वरूप आणले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मराठ्यांच्या पराक्रमाला महाराष्ट्राबाहेर नेणारा हा एक अपराजित योध्दा म्हणून त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरात कोरले गेले.
  • संदर्भ:
- मराठी रियासत खंड ३.             गो. स. सरदेसाई
- प्रतापी बाजीराव.                     म. श्री. दिक्षित
- पेशवा  पहिला बाजीराव.          श. श्री. पुराणिक
- मराठ्यांचा युद्धेतीहास.             ब्रिगेडीअर पित्रे

Tuesday, August 31, 2010

दादाजी कोंडदेव हे सामान्य चाकर नव्हते

daसंशोधन आणि अभ्यासशुन्य असलेल्या संभाजी ब्रिगेडने सभ्यतेचा निच्चांक गाठत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या जीवनात एक अत्यंत महत्त्वाची असामी असणार्‍या दादाजी कोंडदेवांना एक सामान्य चाकर म्हणुन संबोधले आणि त्यांना दादोजी म्हणण्याऐवजी दादु असे निर्लज्जपणे म्हणतात. शिवाजी महाराजही त्यांना दादाजी म्हणत. पण संभाजी ब्रिगेड मजाल पहा ! यातून संभाजी ब्रिगेडच्या व्यक्तीमत्वाच्या निच्चांकाची स्पष्टोक्ती होते.
      खाली अस्सल पत्रांचे ४ नमूने दिले आहेत. या पत्रांच्या मूळ प्रती भारत इतिहास संशोधक मंडळ, १३२१ सदाशिवपेठ, भरतनाटयमंदीरा शेजारी, पुणे ४११०३०. दुरध्वनी (०२०) २४४७२५८१ येथे जतन करून ठेवल्या आहेत. बोरी केंद्रामधील शिवाजी महाराजांच्या पत्राच्या अस्सल प्रती संभाजी ब्रिगेडच्या गुंडांनी जशा जाळून टाकल्या होत्या तसे पुन्हा होऊ नये म्हणुन या पत्रांची मायक्रोफिल्मींग करून ठेवण्यात आली आहे.

अ]   (खालील पत्रात दादाजी कोंडदेव हे कोंढाण्याचे सुभेदार होते हे अगदी स्पष्ट होते. त्याच बरोबर एखद्याचे इनाम सरदेशमुखीस दिले आणि पर्यायी त्यास अन्यत्र इनाम देण्याबद्दल उल्लेख आहे. असा इनाम देण्याचा अधिकार तर सरसेनापतीलासुद्धा नव्हता. मग या अधिकारावरून आणि निर्णयावरून दादाजी कोंडदेवांचे स्थान किती मोठे होते हे निर्विवाद स्पष्ट होते. अर्थात, ईर्षाळू संभाजी ब्रिगेडच्या खोटया व बिनबूडाच्या आरोपाप्रमाणे ते सामान्य चाकर नव्हते).

शिवकालीन पत्रसार संग्रह खंड.१.
पान.१०९, पत्र क्र. ५०७
इ.स.१६४५ डिसें.११
शके १५६७ पौष शु.२
सुहूर १०४६ जिल्काद २
खं.१६ ले.२०

अज दि. दादाजी कोंडदेऊ सुभेदार कोंडाणा
बाबाजी जुंझारराऊ देशमुख तर्फ कानदखोरे
तुझे अंतुरली येथील इनाम सरदेशमुखीस दिल्हे. त्याबद्दल तुला दापोडा येथे इनाम देण्याविषयी लिहीलें आहे.


ब]    (खालील पत्रात सुभेदार या उल्लेखासोबत त्यांचा प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार स्पष्ट होतो).

शिवकालीन पत्रसार संग्रह खंड.१.
पान.१११, पत्र क्र. ५१३
इ.स.१६४६ एप्रिल.२
शके १५६८ चैत्र व.१२
सुहूर १०४६ सफर २५
सा.ले.८२
                        वाटपत्र
दादाजी कोंडदेव _________________  महादाजी गोसावी
आपले भांबोरे वगैरे ७ गाव (कुळकर्ण व ज्योतिष) तुम्हास दिधले.

क]   (हे खुर्दखत तर स्वयं छत्रपती शिवाजी महराजांनी पाठवले आहे. दादाजींचा उल्लेख स्वत: शिवाजी महाराज सुभेदार दादाजी असा करतात. त्याच सुभेदारांना संभाजी ब्रिगेडच्या म्होरक्यांकडून दिशाभूल केले गेलेली निर्बुद्ध दादू असा उल्लेख करतात. हा तर थेट महाराजांचाच अपमान आहे. त्याच बरोबर दादाजी हे काही सामान्य चाकर नव्हते हे ही या पत्रातून सिद्ध होते. हे अस्सल शिवाजी महाराजांच पत्र असल्याने यालाही खोटे कसे म्हणाचे या करीता ब्रिगेडी डोक्यांची घालमेल उडणार आहे).


शिवकालीन पत्रसार संग्रह खंड.१.
पान.११६, पत्र क्र. ५३४
इ.स.१६४७ आक्टो.१५
शके १५६९ आश्विन व.१२
सुहूर १०४८ रम २६
खं.२० ले.२३७

                              खुर्दखत
                        मुद्रा व सिक्का प्रतिपच्चंद्र
            अजर.रा. सिवाजी राजे ------ कार. त॥ कडेपठार प॥ पुणे.........
दरीविले गणेशभट बिन मल्लारीभट भगत मोरया हुजूर ...... ....... जे आपणास इनाम जमीन चावर निमे úú दरसवाद मौजे मोरगौ त॥ म॥ देखील नख्तयाती व महसूल ब॥ फर्मान हुमायूनु व खुर्दखत वजीरानि कारकिर्दी दर कारकिर्दी व ब॥ खुर्दखत माहाराज साहेबु व सनद सुभा त॥ सालगुदस्ता सन सबा चालिले आहे. साल म॥ कारणे दादाजी कोंडदेऊ सुभेदार यासी देवाज्ञा जाली. म्हणउनु माहाली कारकूनु ताज्या खुर्दखताचा उजूर करिताति. दरींबाब सरंजाम होए मालूम जाले. गणेशभट बिन मलारीभट भगवत मोरया यासि इनाम जमीन ...... कारकिर्दी दरकारकिर्दी चालिले असेल तेणेप्रमणे मनासि आणउनु दुमाले करणे. दरहरसाल............ तालीक............. मोर्तब सुदु.


ड]
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड.२.
पान.३९४, पत्र क्र. १४००
इ.स.१६७१ जून.२६
शके १५९३ ज्येष्ठ व.३०
सुहूर १०७२ सफर २८
त्रै.व.७ पृ.४६

तान्हाजी जनार्दन हवालदार व कारकून त॥ निरथडी प॥ पुणें प्रति राजश्री शिवाजी राजे..... परिंचाचे पाटीलकीसी कान्होजी खराडे नसता कथला करून घर तेथे बांधतात. तरी कथला करू न देणे. वैकुंठवासी साहेबाचे (शहाजीराजे) व दादाजीपंताचे कारकिर्दीस चालिले आहे ते करार आहे. तेणेप्रमाणे चालवणे. नवा कथला करूं न देणे.व परिंच्या कान्होजी खराडे यास घर बाधो न देणे. मोर्तब सुद.
                              (मर्यादेयं विराजते)

शिवचरित्रसाहित्य यात असलेले काही संदर्भ.
*     ७ ऑक्टोबर १६७५ - मावळचा सुभेदार महादाजी सामराजयाने कर्यात तरफेचा हवालदार महादाजी नरसप्रभू यांना पाठविलेले एक पत्र. यात शिवाजी महाराजांनी  महादाजी सामराजांस पाठविलेल्या एक पत्राचा सार आहे..." साहेब (शिवाजी महाराज)कोणाला नवे करु देत नाहीदादोजी
कोंडदेवाच्या कारकीर्दीत चालत आले असेल  ते खरे !" असे शिवाजी महाराजांच्या त्या पत्रात म्हटले आहे.

*     २३ जुलै १६७१ - पुणे परगण्याच्या कर्‍हेपठार तर्फे वणपुरी. - "मागे दादोजी कोंडदेवे यांचे कारकीर्दीस ऐसे चालिले असेली,राजेश्री साहेबांचे कारकीर्दीस चालेले  असेली तेणेप्रमाणे
हाली वर्तवणे, जो न वर्ते त्यास ताकीत करणे"

*    १ नोव्हेंबर १६७८ -  कान्होरे रुद्र यांस - "मागे दादोजी कोंडदेवे यांचे कारकीर्दीस ऐसे चालिले असेली,राजेश्री साहेबांचे कारकीर्दीस चालेले  असेली तेणेप्रमाणे
हाली वर्तवणे, जो न वर्ते त्यास ताकीत करणे"


*     दादोजी कोंडदेवांनी बाळ शिवबाचे पहिले लग्न १६-५-१६४० मध्ये लावले असा उल्लेख शिवदिग्विजकार बखरीत येतो. 

सध्याचा लाल महाल ही मूळ वास्तु नाही

ब्रिगेडी लेखक कोकाटे म्हणाला,लाल महाल पुरात्त्वखात्याकडे असला पाहीजे. तो पालीकेच्या अधिकारात का ?
ब्रिगेडी कोळसे-पाटील म्हणाला, २००२ मध्ये लाल महालात दादोजी कोंडदेवचा पुतळा बसवला आणि २००४ मध्ये जेम्स लेनने वादग्रस्त पुस्तक लिहीले. या दोन्ही ठरवून केलेल्या गोष्टी आहेत.

लाल महालाची थोडक्यात माहिती या वाडयाची जागा झांब्रे पाटीलकडून विकत घेतली होती आणि त्यावर लाल महाल हा वाडा बांधण्यात आला होता. त्याचा पाया ५२ ½'  x   ८२ ½' या व्यासाचा होता आणि उंची ३० ½'  होती. त्यास १३ ½' खोलीची तळघरे होती. १६४६-४७ मध्ये शिवाजी महाराजांनी त्यांची राजधानी राजगडला हलवली आणि लालमहालाचा उपयोग प्रशासकीय कामासाठी होऊ लागला. इ.स.१६८९ ते इ.स.१७०७ या धामधूमीच्या काळात लाल महालाची अगदी दुर्दशा झाली. मोडकळीस आलेल्या लाल महालाची १७३४-३५ मध्ये डागडूजी करून थोरल्या बाजीरावांनी तो राणोजी शिंदेंना आणि रामचंद्रपंतांना रहायला दिला. राणोजी शिंदे गेल्यानंतर लाल महालाचा उपयोग गोदाम म्हणुन झाला. त्याला लोकांनी अंबरखाना या नावाने पुकारण्यास सुरुवात केली होती. इ.स.१८१८ मध्ये इंग्रजांनी तो पुर्ण उध्वस्त करून त्याची लाकडं व दगडी ` ३१५ ला विकली. या लाल महालाच्या प्रांगणात एक विहीर होती. दोन करंजे होते. इ.स.१९२५ मध्ये जिजामाता उद्यान बांधण्यात आले. आज जिथे हे जिजामाता उद्यान आहे तिथेच हा वाडा होता. दुर्दैवाने तो कसा दिसत होतो, त्याची रचना कशी होती या बाबत कुणालाच माहिती नाही. १९५० मध्ये पुणे महानगरपालीकेने पुण्याचा सांस्कृतीक वारसा जपण्याचे ठरविले. त्यापैकी पुन्हा लाल महालाच्या प्रतीकृतीची उभारणी हा उपक्रम १९८४ मध्ये हाती घेतला. ही वास्तु इ.स.१९८८ बांधून पुर्ण तयार झाली. सोन्याच्या नांगरच्या प्रकरणामुळे लाल महालला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. म्हणुन त्या प्रसंगाला धरून बाळशिवबाची ब्राँझची प्रतिमा तयार केली. त्याच बरोबर नजर ठेवून देखरेख करणार्‍या राजमाता जिजाबाईसाहेब तसेच प्रशासकीय आणि शिवबाच्या प्रशिक्षणाची बाजू संभाळणारे दादोजी कोंडदेव लाल महालाशी निगडीत असल्या कारणाने त्यांचेही पुतळे उभारले. २००४ मध्ये दादोजींचा पुतळा उभारला गेला हा कोळसे-पाटलाचा कपोलकल्पीत आरोप बिनबूडाचा आहे. हा मूळ लाल महाल नसल्याने पुरातत्त्वखात्याचा या वर काहीच अधिकार नाही. ती पालीकेची मालमत्ता आहे. स्वत:ला इतिहास लेखक म्हणुन प्रसिद्धी मिळवू पाहणार्‍या कोकाटयाला एवढेसुद्धा माहीत नाही ?

Thursday, August 26, 2010

श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडण

श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडण
जनमानसात संत ज्ञानेश्वर-नामदेव-एकनाथ-तुकाराम आणि समर्थ रामदास हे संत पंचक घर करून बसले आहेत ।ज्ञानेश्वरी ,भागवत,नामदेव आणि तुकोबारयांच्या अभांगाच्या गाथा या पाच ग्रंथाना मराठी भाषेचे पाच वेद म्हणून ओळखले जातेय. पाचही ग्रंथात आढळणारी फार मोठे वैचारिक साम्य व एकवाक्यता आहे. त्यातील काही उदा. 
१) जग मिथ्या आहे
२) प्रपंच दु:खमय आहे
३) मन वासनात्मक आहे
४) शरीर मर्त्य आहे
५) वासनेमुळे मनुष्या पुन;पुन्हा जन्माला येतो
६) मोक्ष म्हणजे निर्वासन होऊन पुनर्जन्माच्या चक्रातुन स्वता:ची सुटका करून घेणे
७) त्यासाठी दीर्घकाळ सा धना करावी लागेल
८) मनापासून भक्ति केल्यास भगवंताची प्राप्ती होऊन माणूस एकाच जन्मात मुक्त होऊ शकतो
९) मनाने साधना केल्यास भटकंती होऊ शकेल म्हणून सदगुरूची आवश्यकता आहे
१०) मनुष्य मूळता: ब्रम्हस्वरुप आहे ११) ब्रम्ह अनादी आणि अनंत आहे
१२) एकदम ब्रम्हाची धारणा करा येत नसल्यास ईश्वर ही संकल्पना स्वीकारावी
१३) ईश्वर सगुण आहे आणि ब्रम्हाप्रमाणे निर्गुण देखील आहे
१४) एकच परमेश्वर सगळ्यांच्या हृदयात वास करून आहे
१५) कोणत्याही देवाची उपासना केली तरी ती एकाच परमात्म्याला प्राप्त होते
१६) विविध साधना पद्धतीमधे भेद किंवा अंतरविरोध नसून ती माणसांच्या स्वभावानुसार केलेली सोय आहे
१७) कर्म ,भक्ति ज्ञान आणि योग यापैकी कोणत्याही एका मार्गाने माणूस साधना करून मुक्त होऊ शकतो
१८) मुक्त होण्यासाठी आसक्ती,ममत्व वासना या गोष्टींचा त्याग करावा लागतो
१९) मोक्षासाठी विहित कर्म सोडण्याची गरज नाही.
२०) प्रत्येकाने वर्णव्यवस्थेनुसार आपापले कर्म करावे.

राजवाडेंनी लावून दिलेले भांडण -
१९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत या ५ संतांचे वारकरी आणि धारकरी किंवा प्रवृत्तीवादी आणि निवृत्तीवादी असे वर्गीकरण कुणीही केलेले नाही।परंतु इतिहासाचार्य राजवाडेनी एक लेख लिहिला व समर्थ रामदास हेच खरे संत आहेत तर ' ज्ञानेश्वर ते तुकाराम ' हे वारकरी संत केवळ टाळकुटे होते असा विचार मांडला, वास्तविक पाहाता राजवाडे यांचा हा लेख अतिशय बेजबाबदारपणाचा होता। पण त्यामुळे महाराष्ट्रात एक प्रचंड वैचारिक वादळ निर्माण झाले व साहित्यिक क्षेत्रातील वातावरण अंत्यंट दुषित झाले.वारकरी आणि धारकरी असे दोन गट पडले .वारकर्यांनी समर्थाना मग सकल संत गातेतून वगळले.नंतर मग हे दोन गट कसे भिन्न आहेत याचे विपुल लेखन घडले परिणामी त्या दोन गटातील दरी वाढतच गेली. त्याने एवढे विकृत स्वरुप घेतले की समर्थांची ओवी जर उचारली गेली की काही वारकरी मंडळी टाळ खाली ठेवून कीर्तन बंद पाडीत. स्वता: समर्थनी आपल्या संप्रदायला धारकरी असे म्हंटले नाही. रामदास-तुकाराम भेट ही झालेली. एवढेच नव्हे तर पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात समर्थ रामदासनी स्थापन केलेला मारुती आज ही उभा असून त्याच्या दगडी भिंतीवर
" शरण शरण हनुमंता तुज आलो रामदूता "
हा तुकाराम महाराजांचा अभंग कोरला आहे. जर त्यावेळी वारकरीमधे समर्थाना मनाचे स्थान नसले असते तर मग तिथे हनुमान मंदिर त्याना बंधाता आले असते का? 
रामदास व तुकाराम या संतानी एकमेकांचे प्रशंसा करणारे अभंग लिहिले आहेत।समर्थ रामदासानी इतर ही वारकरी संतांचे गुणगान गायले आहे त्यात अगदी आरत्यांचाही समावेश आहे

समर्थ रामदास कृत आरती व स्तवन

प्रती संत ज्ञानेश्वर-

कलियुगी त्रसूनी गेले सज्जन भवऊष्णे ते समयी अवतारा घेऊनी श्रीकृषणे
तोशविले सज्जन त्या नाना प्रश्ने तेने निरसुनी गेले अज्ञान ट्रू श्णे १
जयदेव जयदेव जय ज्ञान देवा मंगल आरती करतो दे तव पद ठेवा धृ
--------- cont... -------------
दासांचा सारथी म्हणवुनी मी तुजला बाहता दिंडायाला न पावसि का मजला
नुल्लन्घिशी या माते अज्ञविपीन माजला दास म्हणे मम जीव हा तघोंगो बुजला ४ 

प्रती श्री सकल संत -

-निवृत्ती सोपं ज्ञानेश्वर मुक्ताबाई चांगदेव दोघे सुरदास रामदास पाहो
विमळानाद सुखानंद मिराबाई सद्भव
धना सेना कबीर प्रमानंद मेहॉ
पंपदास सज्जन कृष्ण चरचारी
तुलसी नारा नामा विठा वसुरी
जासवन्त गांगल पाठक मुदग ल नरहरी
खेचर जोगा नागा आष्टा बॅहिरो दिंगरी
अलखीदास झाल्हण मनदास रेणुका नंदन
कांपर कूर्मडास आणता गोरा धुंदी जनार्दन
केशवडास चंगा परसोवा नायक पदामण्कको
सुदामा सवता अच्युत एको जनार्दन्

प्रती तुकाराम-
-धन्य धन्य तुझी वाणी ऐकता उन्मनी दिप लागे धन्य निसपरुहता एकविध निष्ठा
श्रुतीभाव स्पष्टा दाखविसी संतोषाले चित्त होताची दर्शन
कॅलो आली खून अवताराची घाटाल्से धडा नामाचा पै गाधा
प्रेमे केला वेडा पांडुरंग नववीधा भक्ति रढविली जगि तारु कलियुगी दास म्हणे 

संत तुकाराम महाराज कृत समर्थ स्तवन -
का स्ताविशी माते दुर्बळ पतिता नामितो समर्था पाय तुझे ब्रम्हाज्ञ ब्राम्हण वैराग्य पुतळा 
रामभजनी लीला अनुपम्य त्रेतायुगी स्वामिसेवा केली भारी श्री रामावतारी महरुद्रा हे आम्हा कळले स्वामींच्या प्रतापे
वाडलो पायपे समर्थांच्या असावी ते कृपा समचरणी दृष्टी वितेवरी गोमती वृत्ती राहो भक्तासे दिन स्वामिंची करुणा
विट्ठ्ल किर्तना प्रेमा रहो तुम्हा संताणलागी मगतासे एक तुका म्हणे सुख संतापायी 

दोन संत एकमेकांचे द्वेष करीत नाहीत मात्र अनुयायी भांडत असतात दोन साहेब कार्यालयात गप्पा मारीत असतातपण त्यांची कुत्री मात्र एकमेकांवर भूंकत असतात। तस हा प्रकार झाला।

मागे एकदा प पु बाबा महाराज सातारकर म्हणाले होते की -
" रामदास की ज्ञानेश्वर ते तुकाराम हा वाद साहित्यिकाणमधला आहे.तो सांप्रदायिकांवर लादु नका. कोणत्याही सांप्रदायिक वारकर्याने समर्थन नावे ठेवली नाही किंवा समर्थंच्या गडावरील मंडळीनि ज्ञानदेवाना नावे ठेवली नाहीत. जे नावे ठेवणारे आहेत त्याना परमार्त कळालाच नाही. त्यांचा विचार करण्याचे कारण नाही. तेंव्हा समर्थ व वारकरी सांप्रदायात द्वैत नाहीच."

समाज सुधारकांनी वाढवलेले द्वैत-

महारष्ट्रात वारकरी संप्रदाय हा सर्वात लोकप्रिय आहे संख्येच्या दृष्टीने ही मोठा आहे।या संप्रदायाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जतीमधे वारकरी संत होऊन गेले सेना न्हा वी ,नामदेव शिंपी ,रोहिदास चांभार ,नरहरी सोनार ,जलोजी आणि तुकोजी पांचाळ हे सुतार, चोखामेळा हरिजन ,तुकाराम वाणी तर ज्ञानेश्वर-एकनाथ हे ब्राम्हण. सर्व जातीतील संत असल्यामुळे हा संप्रदाय खेड्या पाड्यात व बहुजन समाजामधे सर्वदूर पोहोचला पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे शक्तीपीठ आणि भक्तीपीठ बनले। अगोदर सांगितलेल्या कारणांमुळे काही वारकरी मंडळीनी समर्थाना न स्वीकारल्याने महारष्ट्रातील संख्येने मोठे असलेल्या भक्तांकडून समर्थ दूर गेले।वारकरी संप्रदायात बहुजन समाज जास्त असल्यामुळे बहुजन समाज आणि समर्थ यांच्यात एक दुरी निर्माण झाली.त्याच वेळी सामाजिक क्षितिजावर तथाकथित समाजसुधारकांचा उदय झाला आणि ही परिस्थिती आणखीच बिघडली.त्यानी संताना अकारण वेठीस धरले; जातीव्यवस्थेचे निर्मूलन करत असताना ब्राम्हण व ब्राम्हणेतर अशी दुही निर्माण केली आणि त्याचवेळी राज्य करीत असलेले ब्रिटीश मंडळीनि या वादाला खतपाणी घातले.काहीनी तर अगदी मोगल राज्यकर्त्यानी हिंदुंवर केलेल्या अत्याचाराचेही समर्थन केले.
इस्लामी राजवटीला विरोध करणारे - छ्त्रपती। शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामीपैकी शिवरायांच्या वाटेला जाणे परवडण्यासारखे नव्हते म्हणून मग राहीले ते समर्थ ते ब्राम्हण।म्हणजे त्यांच्यावर टीका म्हणजे बहुजन समाजास खुश करणे.आणि बनवून टाकले समर्थाना ब्राम्हणांचे पुढारी. 

स्वामी विवेकानंद म्हणतात- 
" धर्माला नावे ठेवण्याचा समाजसुधारकाना अजिबात अधिकार नाही .कारण त्यांच्यातील एकनेही धर्माची साधणा केलेली नाही.किंवा कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक अनुभूती घेतली नाही. जातीव्यवस्था व वर्णव्यवस्था ह्या सामाजिक संघटना सून टयनचा धर्माशी काहीएक संबंध नाही. तेंव्हा या बद्दल ऊटसूट धर्माला वेठीस धरण्याचे काही कारण नाही।"

धार्मिक क्षेत्रात सर्वच संतानी सामाजिक समता प्रस्थापित केली आहे. 
" हिंदू धर्ममधे ब्राम्हण ,क्षत्रिय ,वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत .
" चातॄवर्ण्य मय सृष्ट्यं गुणकरम् विभागश: "याच सरळ-सरळ अर्थ असा की ही वर्णव्यवस्था रामायण-महाभारत काळापासून अस्तित्वात होती.
आणि भगवंताने हे पण स्पष्ट म्हंटले आहे की, वर्णव्यव्यस्था ही कर्मावर आधारित आहे;
ब्राम्हण- ज्याला भौतिक जगाचे काहीएक आकर्षण नाही व जो पूर्णपणे आत उतरला आहे।
क्षत्रिय - ज्याला सत्ता व संपत्ती यांचे आकर्षण असून एकादे राज्य निर्माण करण्याची महत्वाकांक्षा आहे।
वैश्य - ज्याला संपत्तीचा लोभ आहे आणि स्वार्थ आहे असा।
शुद्र् - ज्याच्याकडे गुणवत्ता नसल्यामुळे कुठलीही महत्त्वकांक्षा नाही असा।


गुणकर्मानुसार असलेली वर्णव्यवस्था कुणीही नाकारणार नाही

उदा- कारखाना निर्माण करण्यासाठी ज्याचा मेंदु कार्यरत असतो तो ब्राम्हाण,
व्यवस्थापन सांभाळणारे संचालक म्हणजे क्षत्रिय
मालाची विक्री करुन नफ़ा मिळवुन देणारे म्हणजे वैश्य
आपली सेवा विकुन अर्थार्जन करणारे सेवकवर्ग म्हणजे शुद्र्

स्वामी विवेकानंद म्हणतात,
"मला अश्या प्रकारची समाजव्यवस्था हवी आहे जिथे शंकराचार्यांचा मेंदु असेल,महंमदाची समता असेल,बुद्दाची करुणा असेल आणि कॄष्णाचे चातुर्य असेल।"


संतानी भक्तिच्या क्षेत्रात समता आणण्याचा प्रयत्न केला; समाजव्यवस्था बदलण्यासाठी त्यानी कधीही बंड पुकारले नाही। हा संतांचा दोष नसुन सामाजिक मानसिकतेचा आहे.स्वामी विवेकानंद केवढे मोठे क्रांतिकारक संत पण ते दक्षिणेश्वराच्या काली मातेच्या मंदिरातील देवीला बोकड बळी देण्याची प्रथा बंद करु शकले नाही किंवा भगिनी निवेदिता यांना ते काली मातेच्या मंदिरात दर्शनाला नेऊ शकले नाही तुकाराम
महाराज हे वेद व शास्त्र यांचे कडवे अभिमानी होते। 
ते म्हणतात-" वेदा निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकीया खळ ॥ १३४५॥ " 
प्रत्येक संताला कोणत्या ना कॊणत्या जातिच्या माणसांनी त्रास दिला आहे पण संतानी कधी त्याला जातीयतेचा रंग दिला नाही. शिकागो धर्म परिषदेवरुन आल्यावर विवेकानंदाना जगन्नाथपुरीच्या पुजार्याने मंदिर प्रवेश नाकारल्यावर जर त्यांनी लोकाना भडकावुन दिले असते तर आपण विचार ही करु शकत नाही. ते आपल्या गुरुबंधुला लिहिलेल्या पत्रात म्हणतात - " मी जगाकडुन खुप सन्मान स्विकारले आहे आता निंदा देखिल सहन केले पाहिजे " ।पंतप्रधाना असतानाच ईंदिरा गांधी याना देखील मंदिर प्रवेश नाकरला गेल्यावर जर त्यानी मनात आणले असते तर त्या पुजार्याला कामावरुन काढुन टाकले असते. पण केवळ सुसंस्कॄतपणा म्हणुन त्यांनी त्या पुजार्याला सोडुन दिले

रामदास जातीयवादी ??

-समर्थ म्हणतात-" मराठा तितुका मेळवावा " म्हणजे त्याना मराठा समाजबद्दल अभिमान असावा , " भेटो कोणी नर । धेड, महार वा चांभार । जाणावे अंतर । या नाव भजन ॥" म्हणजे त्याना बहुजन समाजाबद्दल हि बराच कळवळा होता.
ब्राम्हणाबद्दल, ब्राम्हणांच्या सोवळ्याबद्दल बोलताना ते म्हणतात - " सोवळे कोणते रे । ब्राम्हणा ओवळे कोणते रे ॥" म्हणजे ते पक्के ब्राम्हणद्वेष्टे होते हे सिद्द् होते. पण आजकालचे स्वयंघोषित पुढारी त्याना मात्र ब्राम्हणांचे पुढारी का ठरवू पहात आहेत कोण जाणे?
ज्या प्रमाणे वकिल लोक आपल्या प्रतिस्पर्धिचे कुठले तरी वाक्य आणुन त्याचा मनमानी अर्थ लावुन त्याला नाही नाही ते आरोप चिटकवतात तसे हे कावळ्याची नजर असलेल्या पण साहित्यिकाची आव आणणारया लेखकांनी समर्थांवर आरोप करुन स्वत:ची घाण त्यांच्यावर टाकायचा प्रयत्न केला आहे.
काविळ झालेल्याला जसे सगळिकडॆ पिवळे दिसत असते तसे त्या लोकांना सतत समर्थ द्वेषच दिसतो॥शेवटी - " तो काक पक्षी । क्षते परिक्षी । क्षतेच लक्षी "हेच खरे.


समर्थांचे शिष्यगण-यात इतर बहुजन वर्गही जास्त होता - धोंडिबा धनगर,दत्ता न्हावी,बाजी गोसावी,वली महंमद,फाजलखान ई.वली महंमद तर मराठवाड्यातील मठांचा प्रमुख होता. महात्मा गांधी जेंव्हा नेतृत्व करित होते तेंव्हा सर्व प्रांताचे पुढारी हे ब्राम्हण होते पण म्हणुन कांही ते ब्राम्हणांचे पुढारी होवु शकत नाहित.
परवाच वारलेले श्री। नानासाहेब धर्माधिकारी यांचे १ कोटी शिष्य गण आहेत. त्यानी आयुष्यभर दासबोधाचे निरुपण केले. तसेच त्यानी शेकडो निरुपणकार बनवले त्यात अगदि भांडी घासणार्या स्त्र्यियांपासुन ते भाजी विकणार्या मायेपर्यंत लोक आहेत. मुठभर शिष्यांचे काम बगुन जर समर्थाना दोष देणार असाल तर मग आज महापुरुष म्हणवुन घेतले जाणार्यांचे काय्? त्यांच्या शिष्याने केलेली कु-कर्मे त्यांच्यावर कसे थोपवता येते?

एक घटना -
राज्याभिषेक समयी शिवरायांना २०० हिंदुंचे शुद्दिकरण करायचे होते पण तत्कालीन समाजातील सनातनवाद्यांमुळे ते शक्य झाले नाही पण वैयक्तिक जीवनात त्यानी नेताजी पालकर,बजाजी निंबाळकर यांना परत हिंदू धर्मात आणले. जर कोणी उद्या उठुन असे म्हणाला कि २०० लोकाना शिवरायांनी दिलेल शब्द फिरवला तर ते मुर्खपणाचे ठरेल. छ.शाहुनी मराठा समाजतील शंकराचार्यांचे पीठ ही बनवले व भिक्षुक निर्माण करण्याचा हि प्रयत्न् केला पण खुद्द् मराठा समाजानेच ते नाकारले..( पण आज तेच मराठे आरक्षणासाठी आंदोलन करित आहेत काय दुर्दैवविलास आहे पहा.)

तुकाराम महाराजांचा खुन होतो ब्राम्हणाकडुन ,ते झाकण्यासाठी ते वैकूंठ ला गेले अस अपप्रचार ब्राम्हण करतात असा ही आरोप होतो... तुकाराम महाराजांचा खुन होतो व तेही केवळ १२ मैल दुर असलेल्या पुणे इथे राहणार्या शिवरायाना देखिल कळत नाही जिथे शिवरायांचा साम्राज्य आहे .
अश्याप्रकारे हे केवळ तुकारामांचाच नव्हे तर छ।शिवरायांचा देखिल अपमान करित आहेत.
अफजलखानचा वकील हा ब्राम्हण होता म्हणुन त्याचा राजकारण करणारे हे मुद्दाम लपवतात कि अफजलखानच्या सैन्यात कित्येक मराठी सरदारच नव्हे तर शिवरायांचे नातेवाईक ही होते. एवढेच काय छ्.शंभुराजे औरंगजेब शी लढत असताना शिवरायांचे सहा जावई संभाजी राजांविरुद्द् लढत होते.
एका शिखांने इंदिरा गांधींची हत्या केली तर ते विसरले जाते पण एक ब्राम्हणाने म।गांधींची हत्या केली हे मात्र ६० वर्षे झाली तरी विसरले जात नाही।मतांसाठी शिखांची माफी मागितल जात पण ब्राम्हणाना झोडपल जात।

शिव-समर्थ पत्रे -दोन्ही महापुरुषांनी एकमेकास लिहिलेली पत्रे उपलब्द आहेत.
१) १६४९ ला समर्थांनी शिवरायांस लेहिलेल पत्र
2) १५ ओक्टोबर १६७८ ला शिवरायानी समर्थास लिहिलेल पत्र ( चाफळ ची सनद )
३) १६८१ शिवरायांच्या अकाली निधनानंतर संभाजीना लेहिलेल पत्र
४) १३ जानेवारी १६८२ ला संभाजी राजाना केलेला उपदेश.

इतकेच काय शहाजी राजे व समर्थांचा भेटीचा कागद आजही तंजावर येथिल मराठी ग्रंथालयात ' भोसले रुमाल' या बाडात उपलब्द आहे. 

शिव-समर्थ भेट -

पहिली भेट चाफळ पासुन २ मैल अंतरावर असलेल्या शिंगणवाडी येथे झालि. ( सन १६४९ ,१२ एप्रिल)दुसरी भेट शिवथर घळ इथे १६७६ साली.
शिवरायांच्या चरित्रात तुकाराम महाराजांचा जास्त उल्लेख येत नाही याचे कारण तुकाराम महाराज जेंव्हा वैकुंठ ला गेले त्यावेळी शिवराय हे केवळ १९ वर्षाचे होते. या उलट समर्थ हे महाराजांच्या निर्वाणानंतर दोन वर्षानी समाधिस्त झाले त्यामुळे संपुर्ण शिवचरित्राचे ते साक्षीदार बनले.
बाबा महाराज सातारकर म्हणतात कि- " तुकाराम व समर्थ रामदास हे शिवछत्रपतींचे दोन डोळे होते हे कोणीही नाकारु शकत नाहीत" 
शिवराज्याभिषेक व समर्थांची अनुपस्थिती-

अनेकदा शत्रु गंमत पाहण्यासाठी व फोडझोड करण्यासाठी उपस्थित असतात. राज्याभिषेकाला इंग्रज अधिकारी देखिल आले होते ते काय फार प्रेमाने नव्हे. तो राजनितीचा एक भाग असतो. म्हणुन मग काय समर्थ व शिवराय यांची भेटच् झाली नाही असे म्हणणे कितपत बरोबर हे तुम्हीच ठरवा.
प्रभु रामचंद्राच्या जडणघडणित विश्वमित्रांचे स्थान अबाधित आहे पण राम-राज्याभिषेकावेळी ते कुठे उपस्थित होते? मग असे म्हणणार का त्यांची भेटच झाली नाही? 

सांप्रदायिक चरित्रकारांच्या चुका -

राजा पेक्षा प्रजा अधिक राजनिष्ट म्हंटल्या प्रमाणे समर्थांनी कधिही स्वत: कडॆ स्वराज्य स्थापनेचे श्रेय घेतले नाही ।पण काही शिष्यानी हे तत्त्व न पाळुन समर्थाना श्रेय तर शिवरायाना केवळ आज्ञाधारक बनवुन टाकले.
हिंदवी स्वराज्य़ स्थापनेची प्रेरणा मातोश्री जिजाबाईंची तर सर्व मेहनत शिवरायांची होती यात काही वादच नाही.
एकाद्या आमदाराचे किंवा एकाद्या खासदाराचे निर्णय हे जसे पुर्ण पक्षाचे होवु शकत नाही किंवाएकाद्या स्वय़ंसेवकाचे निर्णय जसे संपुर्ण संघाचे निर्णय होत नाही तसेच एका शिष्याचे चुक ही संपुर्ण संप्रदायची होवु शकत नाही.

राजकारणात खर्या राजकारणाचे कागदपत्र उपलब्द नसतात। जे उपलब्द असतात ते राजकारण नसतात तर ते प्रशासनाचे भाग असतात। "राजकारण बहुत करावे । परंतु कळोचि न द्यावे ।" 
अफजल खानाच्या आगमनाची गुप्त सुचना देणारे पत्र
- विवेके करावे कार्यसाधन
जाणार नरतनु हे जाणून
पुढील भविष्यार्थी मन
रहाटोचिं नये॥१
चालो नये असन्मार्गी
सत्यता बाणल्या अंगी
रघुवीरकृपा ते प्रसंगी
दासामहात्म्य वाढवी॥२
रजनीनाथ आणि दिनकर
नित्यनेमे करिती संचार
घालिताती येरझार।लाविले भ्रमण जगदीशे॥३
आदिमाया मूळ भवानी।
हेचि जगाची स्वामिनी।

येकांती विवंचना करोनी । इष्ट योजना करावी॥४॥ 

विजापुरचा सरदार निघाला आहे.
असा स्पष्ट संदेश त्यात मुद्रीत झालेला दिसतो. खान निघाल्याची खबर देणार पत्र

डेमिंग या इंग्रज इतिहासकाराचे एक प्रसिद्द वाक्य आहे - " Shivaji and Ramdas were two bodies but one soul"

अन्य कांही आक्षेपांचे खंडन -
१) लग्न मंडपातुन पळुन गेल्या मुळॆ एका स्त्री वर अन्याय
- त्या स्त्रिचे त्याच लग्न मंडपात दुसर्या मुलाशी लग्न लावुन देण्यात आले। त्यामुळे त्या स्त्री वर अन्याय झाला असे म्हणालात तर ते कसे खरे मानायचे?
२) तुकारामानी " भिक्षापात्र अवलंबविणे । जळो जिणे लाजिरवाणे "असे म्हणाले व समर्थ संप्रदाय हा भिक्षेवर अवलंबुन आहे त्यामुळे ते ( तुकाराम ) समर्थविरोधी होते
- पण स्वता: तुकाराम महाराजच काय आज देखील वारकरी मंडळी पंढरपुर ला वारीला जात असताना भिक्षेचा आश्रय घेत असतात
३) समर्थानी जे लिखाण केले ते कारकुनी होते 
- समर्थ हे साहित्यिक होते असे प्रशस्तीपत्रक कुणा लुंग्यासुंग्या कडुन घेण्याची काहिही गरज नाहिये। 
नराधमांचे विद्रोही साहित्य संमेलन-
नावालाच विद्रोही पण काम मात्र हे संत व देशद्रोही करत आहेत। समर्थ रामदासच नव्हे तर संत ज्ञानेश्वर व संत एकनाथ यांच्यावरही हे विद्रोही घसरले।
स्वामी विवेकानंद म्हणतात - " द्वेषावर आधारेत कार्य जास्त दिवस टिकत नाही।" 

आता गाडी इतरांवरही -
इतके दिवस रामदासांवर बोंबलत असलेली मंडळी आता हळुह्ळु ज्ञानदेवांवर घसरत आहेत। जाहीर सभेंमधुन ते सांगत आहेत कि,
- ग्यानबा-तुकाराम म्हणण्या ऐवजी नामदेव-तुकाराम म्हणा 
- स्वातंत्र्यवीर सावरकरांना या हरामखोरांनी 'संडासवीर' असे म्हंटले आहे
तर्- झाशिच्या राणी लक्ष्मिबाईला याच हरामखोरांनी ' इंग्रजांची बटीक ' म्हंटले आहे
- तर लोकमान्य टिळकांना या लोकांनी ' भटमान्य' असे म्हंटले आहे

इतिहासाच्या अभ्यासाला जातियवादाचे ग्रहण - 
आजचे हे तथाकथित इतिहासकार फक्त जातिवरुनच इतिहासाचे एकांगी लिखाण करित आहेत। त्यातुन मुर्ख सरकार असले कि झाले वाट लागणारच या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचे या वादातुनच मग दादोजी कोंडदेव पुरस्कार वाद तर कधी सरस्वतीपुजन वरुन वाद होतात । 
समर्थांच्या चारित्र्याची चर्चा - 
नागपुरच्या माकडाने मर्कटश्री मा म देशमुख समर्थांसारख्या महापुरुषाच्या चारित्र्यावर शितोंडे उडवणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा
'अध्यात्मात वस्त्र् देणे' हा वाक्य प्रचार आहे हे या मुर्खाना कधी कळणार?
सुफी संप्रदायात देखिल स्त्रियांचे वस्त्र अंगावर परिधान करुन देहबुध्दि संपल्याचे दाखविण्याचे एक संकेत आहे. या मुर्ख विद्रोहीनी गिरिधर स्वामींची मुळ ओळी न देता एका ओळिचा आपल्याला हवे तसे अर्थे घेवुन दळभद्री आरोप समर्थांवर करावे या सारखा विनोद शोधुनही सापडणार नाही.शेवटी काय 
मनी वसे ( विद्रोहींच्या ) ते स्वप्नी ( मुखी) दिसे
एकाद्या ग्रंथातील शेकडो प्रतिकुल संदर्भ सोडायचे व एकाद्या प्रसंगाचा मनमानी अर्थे लावयचा व वर इतिहास संशोधकाचा आव आणयचा हे म्हणजे - शेळीने वाघाची कातडी पांघरुन स्वता:ला वाघ म्हणून घेण्यासारखे आहे.न र फाटक यांचे एक वाक्य घेवुन वाद माजविणारे त्यांनी समर्थांचा शेकडो वेळा केलेले कौतुक मात्र लपवायचे असे का?
शेवटी काय या मुर्खांकडुन समर्थांसाठी प्रशस्तिपत्रक घेणे म्हणजे एकाद्या वारंगनेकडुन प्रतिव्रतेने प्रशस्तिपत्रक मिळविल्यासारखे होइल किंवा गटारीकडुन गंगा पवित्र असल्याचा प्रशस्तिपत्रक मिळविल्यासारखे होय् 

शिव्या देण्यासाठी अभ्यास करावा लागत नाही मात्र रचनात्मक लिहिण्यासाठी प्रतिभा व अभ्यास लागते या दोन्ही गोष्टिंचा या मंडळीकडॆ दुष्काळ.
डॉ.हेडगेवार सरसंघसंचालक असताना संघाच्या शाखेंवर प्रार्थना संपली म्हणजे " राष्ट्रगुरु स्वामी रामदास की जय " असे म्हणण्याची पद्दत होती शेवटी समर्थांचा शिवरायांवर केलेला काव्य देत आहे. जे फ़क्त मराठी मनात च नव्हे तर सर्व शिवभक्ताना प्रिय आहे -
" निश्चयाचा महामेरु । बहुत जनासी आधारु ॥
अखंड स्थितिचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥ "

" शिवरायांचे आठवावे रुप। शिवरायांचा आठवावा साक्षेप ॥
शिवरायांचा आठवावा प्रताप । भुमंडळी
त्याहुन करावे विशेष । तरिच म्हणावे पुरुष
या उपरी आता विशेष । काय सांगावे? ॥ "
मला वाटते वरील माहिती वाचल्यावर एकादा अभ्यासु माणुस नक्किच विचार करेल व खरे-खोटे काय ते जाणून् घेइल्